आता गिरण्यांमध्ये काम करत नाही आम्ही
“मी १९६१-२ साली शेतमजुरांवर एक लेख लिहिला. हे माझे पहिले ‘भारतीय’ संशोधन. नंतरही मी कामाच्या शोधात आपली गावे सोडणाऱ्या भूमिहीनांसोबतच राहिलो. बहुतेकांना कायम नोकऱ्यांची, त्यांच्यातील हितकर सामाजिक सेवाशर्तीची आशा नसे. ते औपचारिक क्षेत्रातील ‘बिनीच्या’ कामगारांसोबत नसत. ट्रेड यूनियन चळवळ मात्र अर्थव्यवस्थेच्या औपचारिक भागापलिकडे पोचलेली नाही.” “पण त्यांची मुले-नातवंडे तरी सुस्थितीत पोचतील का ? शासक-प्रशासक शेतीकडून …